आज दसरा... सण म्हंटला की जणू मनाला सवयच लागलीये बालपणीच्या आठवणींच्या पोतडीतून काही क्षण हाती लागतात का बघायची. दसरा-दिवाळी हे सण पाठच्या भावा-बहिणींसारखें येतात. दसरा येतो तेच दिवाळी येणार आहे हे सांगत. पण म्हणून काही त्याचं कौतुक करून घ्यायला तो विसरत नाही. आठवतंय तेव्हापासून दसराही आपल्याच थाटात येतो आणि कळत नकळत नवी सुरुवात देऊन जातो…… Continue reading दसरा…
Tag: #childhood #nostalgia #marathiwriteups
आली दिवाळी…
परवा ऑफिस मधून निघतांना हॉलिडे कॅलेंडर वर नजर गेली तेव्हा क्लिक झालं 'अरे, दिवाळी आठवड्यावर आलीये आणि आता तयारी सुरु करावीच ...' आणि मग कॅब मधल्या निवांत वेळेत कामांची, खरेदीची यादी तयार करायला घेतली. ऑफिस ची सवय.. "task list" बनवायची!! फराळाच्या पदार्थांची पाककृती इंटरनेट वर बघतांना हरवलं की मन आठवणींमध्ये... लहानपणी तर...दिवाळी म्हंटलं की महिनाभर… Continue reading आली दिवाळी…