पावसाचं जोरदार बरसणं
आई रागवत असतांनाही चिंब भिजणं
कागदी होड्या पाण्यात सोडणं
सवंगड्यांसह गारा वेचणं…
सगळं मागे राहिलय,
आता पावसाचं नवं रूप मी पाहिलय
पाऊस आता रिमझिम बरसतो
ओल्या मातीचा सुगंध धुंद करतो
ह्या पावसाचे थेंब मन अलगद टिपतं
अन् मन वेडं चिंब भिजतं…
हातात वाफळलेल्या चहाचा कप,
सोबत स्वरधुंद गाणं
अन् अशा या हळव्या क्षणी कुणी तरी
हळूच मनात प्रवेश करणं…
पाऊस तोच फक्त वयासह भावनांचे
अर्थ बदलले…
पावसाच्या अमृतात भिजून
मला हे शब्दं सुचले…
– अमृता…
© The copyright and other intellectual property rights of this content and material including photographs , graphical images and the layout is owned by the author and soulsanvaad.com
Awesome 😊
LikeLiked by 1 person
Thank you!!
LikeLike
You capture the reality poetically.. awesome.
LikeLiked by 1 person
Thank you!!
LikeLike
Wah Amruta!! You have captured the true essence of this beautiful rains:) Keep writing such beautiful lines.
LikeLiked by 1 person
Thanks Shanthi
LikeLike