आज आहे आजोबांचा ७५ वा वाढदिवस
ह्याची तयारी करत होते सगळे गेली कितीतरी दिवस
प्रत्येकाने त्यांनां द्यायची ठरवली एखादी स्पेशल भेट
‘मी काय देऊ ‘ विचार करून दमलेललं डोकं माझं मला म्हणालं त्यानांच जाऊन विचार थेट
मन माझं विचार करू लागलं –
मी काय त्यांना देणार त्यांच्याजवळ आहे सगळं काही
उलट त्यांनीच आम्हाला दिलंय बरच काही
मग म्हंटल त्यांना एक आगळीच भेट देऊया
त्यांच्यावर एक कविताच करूया –
अरे, पण कवितेत न मावणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत त्यांच्याविषयी
असं करते लिहिते कविता त्यांनी सांगितलेल्या गोष्टींविषयी…
त्यांनी आम्हांला सांगितल्या गोष्टी अमरावतीच्या झोपाळ्यावार
कळत-नकळत केले संस्कार आमच्या मनावर
इसापनीतींच्या गोष्टींमधून शिकवलं तात्पर्य जगण्याचं
आणि स्वतःचं चांगलं – वाईट स्वतः च ओळखण्याचं
परीकथांतून नेलं आम्हांला दूर स्वप्नांच्या देशात
त्याच बरोबर आमची स्वप्न पूर्ण करण्याचा जागवला अत्मविश्वास आमच्यात
पौराणिक कथा सांगून जोडली संस्कृतीशी आमच्या मनाची नाळ
त्याचबरोबर दाखवला आम्हाला आजचा नवा स्पर्धात्मक काळ
इतकं सगळं देणाऱ्या आजोबांना मी आणखीन काय देणार ?
खरंतर आज मी त्यांनाच काहीतरी मागणार….
आजोबा —
विनंती नव्हे एक हक्काचं मागणं आहे तुमच्याजवळ
नेहमी मिळू द्या तुमचा सहवास प्रेमळ
इच्छा आहे अमरावतीच्या ‘त्या’ झोपाळ्यावर परत जाण्याची
झोके घेत तुमच्याकडून नवीन गोष्टी ऐकण्याची …
काय आजोबा चलाल ना ?? — अमृता..
बरीच जुनी कविता आहे .. अगदी १८ वर्ष जुनी .. आज इथे असं मांडण्याचं कारण – आजोबांची आठवण; आज वेगळ्या दुःखद कारणाने !
ह्या कवितेची आठवण अशी- ही कविता त्यांना तेव्हाही भावलेली .. आणि त्यांनतर भेटल्यावर /फोनवर हिचा उल्लेख ते नेहमी करायचे अगदी काल-परवा पर्यंत…
© 17.03.2021 The copyright and other intellectual property rights of this content are with the author and Soulसंवाद .
Chaan. Stay strong.
LikeLiked by 1 person
Thanks Rupali !!
LikeLiked by 1 person
खूप छान.
LikeLiked by 1 person
Thank you!!
LikeLike