एकदा मन माझं माझ्यावर रूसलं
चिडून गाल फुगवून बसलं,
मला म्हणालं-
तुला कधीच नसतो माझ्यासाठी वेळ
घड्याळाचा अन् तुझा चालतो पाठशिवणीचा खेळ
आठवून बघ, कधी माझ्यासोबत निवांत बोलली होतीस?
कधी माझ्याबरोबर खळखळून हसली होतीस?
आज त्याचा राग दूर करायचा ठरवलं
अन् मनाला माझ्या, आठवणींमध्ये फिरवलं
ठरवलं आज याच्याशी मारायच्या खूप खूप गप्पा
एक एक करून उघडायचा आठवणींचा कप्पा
एका कप्प्यात होत्या बालपणीच्या आठवणी
गोळा केलेले शंख, शिंपले अन् नाणी
ते सारे निरागस क्षण पळवले कुणी
शिंपल्यातलेही मोती हरवले राहिले नुसते पाणी
एक कप्पा आजी-आजोबांच्या गोष्टींनी भरला होता
शब्द जरी विरले, तरी भाव तयातला मज आठवत होता
एका कप्प्यात होते ध्येय अन् स्वप्न आयुष्याची
काही त्यातली पूर्ण तर काही अजून गाठायची
या सगळ्यात रमते न रमते तोच-
मनाने माझ्या आवाज दिला
‘चल गत आठवणींमध्ये रमू नकोस गाठायचय भविष्याला
पण सोबत असू देत यांची शिदोरी
आयुष्यभर साथ मिळेल यांची खरी’
असंय मन माझं विचित्र,
कधी रमतं भूतकाळात तर कधी रंगवत भविष्याच चित्र!!
~ अमृता …
(नव्याने उलगडलेला आठवणींचा कप्पा- अशाच एका जुन्या डायरीतून…)
© The copyright and other intellectual property rights of this content and material including photographs , graphical images and the layout is owned by the author and soulsanvaad.com
Amazing!! Keep writing 🙂
LikeLiked by 1 person
Ok Mam.. thank u 🙂
LikeLike
वाचता वाचता माझ्या आठवणींचे काही कप्पे उघडले….सुंदर.👌😊
LikeLiked by 1 person
Well written Amruta!! Makes one nostalgic🙂
LikeLiked by 1 person
Glad you like it. Thanks for stopping by!!
LikeLike
Awesome Amruta Tai!
Scholar, traveller, leader and now a poet too!
Truly you are setting pretty high standards for us 🌟
LikeLiked by 1 person
Thank you for the kind and generous words !! 🙂
LikeLike
Khupch sundar…mast
LikeLiked by 1 person
Thanks Harsh 🙂
LikeLike
Khup sunder lihile ahe 👌..superb
LikeLiked by 1 person
Thanks Gauri
LikeLike
Superb Poem , actually takes us back in time and makes us realise the present ..
LikeLiked by 1 person
Thanks Aditya 🙂
LikeLike